STORYMIRROR

Prasad Kulkarni

Others

4  

Prasad Kulkarni

Others

एन्जॉय

एन्जॉय

1 min
443

आयुष्य गतीने पुढे सरकावं

मनातलं खूपसं मागे राहावं

नंतर कुढत बसण्यापेक्षा

कधीतरी, स्वतःसाठी मस्त जगावं


भल्या पहाटे उठून बसावं

की बिछान्यात मजेत मस्त लोळावं

पेंगुळल्या डोळ्यांनी वावरण्यापेक्षा

कधीतरी, स्वतःसाठी मस्त जगावं


कॉफी घ्यावी की करावा चहा

लुडकावं का पुन्हा वाजलेयत सहा

न ठरवता काहीच तिथेच पसरावं

कधीतरी, स्वतःसाठी मस्त जगावं


पहाटेच्या स्वप्नात जावं हरखून

स्वप्नाच्या दुनियेत यावं अलवार फिरून

उन्हाच्या तिरीपेनं अखेर उठवावं

कधीतरी, स्वतःसाठी मस्त जगावं


संपूर्ण दिवस आपला असावा

कुणालाच त्यात व्हॉईस नसावा

मनाला वाटेल तसं सजावं

कधीतरी, स्वतःसाठी मस्त जगावं


नेसावी साडी की चढवावा ड्रेस

सुरकुत्या पडलेला की करावा प्रेस

अंघोळीला बुट्टी मारून तडक निघावं

कधीतरी, स्वतःसाठी मस्त जगावं


एकटीने दिवस करावा एन्जॉय

कुण्णाच्याही खांद्या-हाताशिवाय

स्वतःच्या दुनियेतून पुन्हा एकदा -

रूटीन आयुष्यात परतावं

कधीतरी मात्र, स्वतःसाठी मस्त जगावं


Rate this content
Log in