STORYMIRROR

Sapna Fulzele

Tragedy

4  

Sapna Fulzele

Tragedy

उभे आयुष्य झाले सरपण

उभे आयुष्य झाले सरपण

1 min
186


बंद पुस्तक अन् बंदची पान, 

नकोच हवी ती जाणिवेची जाण..

तुझा असो वा माझा थांबा एकची, 

जिवाचा प्रत्येक श्वास गहाण....


युगानुयुगे सरली तरीही, 

वय दुःखाचे अजुन तरुण  

जिवंत वेदनेच्या खपलीमागे,

असे भावनांचे रुदन करुण...


भळभळत्या जखमा माणुसकीच्या,

जातीपातीचे त्यावर गोंदण...

फासावरती मढे लटकती,

भाळी त्यांच्या दारिद्रयाचे कोंदण... 


आरशातल्या प्रतिबिंबातुन,

कधी गळावे माझे मी पण... 

जळते रान जिवनाचे 

उभे आयुष्य झाले सरपण 

उभे आयुष्य झाले सरपण...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy