STORYMIRROR

Sapna Fulzele

Others

4  

Sapna Fulzele

Others

देह

देह

1 min
412

या जगासाठी,

या पुरुष श्रेष्ठांसाठी 

तु आहेस फक्त देह…

शरीराच्या वासना तृप्त

करणारा फक्त एक देह…

त्याच्या लेखी तुझं अस्तित्व काय?

फक्त एक सुंदर मांसल देह…

ज्या देहामुळे मिळाली 

त्याला त्याची पहिली नजर…

का भिरभिरते त्याच 

देहावरती त्याच्या वासनेची नजर?

ज्या पदराखाली करतो तो जन्माचा

पहिला जीवन रस ग्रहण…

का मोठेपणी तो पदर सरकताच 

वाढतात त्याच्या हृदयाची स्पंदन?


तू देवी, तू माता

पुस्तकापूरती फक्त लिहिती…

वास्तवात मात्र पाहीजे असतो

तुझा देहच त्यांच्या हाती…

तू आदी, तू शक्ती 

मोठमोठ्याने पिटवून सांगतात छाती…

खऱ्या अर्थाने मात्र 

तुला उपभोग्य म्हणुनच पाहती…

नेहमी वळवळते 

तुझ्या देहावरच त्याची नजर…

नसते कळत त्याला कधी 

तुझ्या भावनांची कदर…

हा देहच निर्माण करतो तुझासारखा 

दुसरा एक सृजन देह…

मात्र तिथेही मुलगा-मुलगी मतभेदातच

जाणला जातो फक्त देह…


प्रेम, विश्वास, नाती असं 

काही नसतंच त्याच्या लेखी…

तु मात्र त्याच्या भोवतीच

आपलं आयुष्य गुंफशी…

कधी कळणार वेडे तुला,

अगं कधी कळणार?

तू आहेस त्याच्या जीवनपटातील

बुद्धिबळचा फक्त एक डाव…

चालही त्याचीच, खेळही त्याचाच 

आणि तू फक्त त्यातील एक सोंगटी…

तुझ्याच देहावरती हा डाव चालतो 

खरंतर तुझ्या देहासाठीच 

हा खेळ चालतो…

हा खेळ खेळताना तो 

असुरी आनंद उपभोगतो…

अन् तुझा जीव मात्र 

त्याच्यासाठीच तीळतीळ तूटतो…

त्याच्या सुखासाठी, त्याच्या तृप्तीसाठी 

झिजतो, करपतो, मरतो तुझा देह…

अन् तो मात्र शोधायला निघतो 

पुन्हा एक सुंदर, रेखीव, मांसल देह 

पुन्हा एक मांसल देह… पुन्हा एक देह…


Rate this content
Log in