STORYMIRROR

Sapna Fulzele

Others

3  

Sapna Fulzele

Others

'स्त्रि'त्व

'स्त्रि'त्व

1 min
290

तू तोड कितीही, माझ्या निर्धाराची वेल...

तू काप कितीही, माझ्या धाडसाचा दोर. 


घालशील किती, माझ्या अस्मितेवर घाव... 

कर दाट तू कितीही, तुझ्या पौरुषाचे धुके.


लावशील किती, माझ्या स्वप्नांवर पहारे...

छाट तू कितीही, माझ्या अस्तित्वाचे पंख.


स्वतःच्या जखमेवर, टाके स्वतःच घालेन...

उन्मळून पुन्हा पुन्हा, मी नव्याने रुजेन.


हळव्या वाटा स्त्रित्वाच्या, माझ्या मीच जपेन...

जिद्दीच्या बळावर, पायरी यशाची चढेन.


असे निसर्गाचा वर, मी स्वतःच घडेन...

झेप घेऊन गरुडी, उंच आकाशी उडेन.


       


Rate this content
Log in