STORYMIRROR

Ratnesh Chaudhari

Romance Tragedy

4  

Ratnesh Chaudhari

Romance Tragedy

गजल

गजल

1 min
173

मनरुपी अवखळ वासराला कधीच बांधून ठेवले आहे.

तरीही अशक्य तेच वलयांकित पणे खोलवर जाते आहे?


जुन्या आठवणीतील प्रेम माझे आटोकाट छळते आहे.

का कुणास ठाऊक मन प्रियेसाठी का बरं झुरते आहे?


रंग प्रितीचे फिके अन निरस झाल्यागत जमा आहे.

तरीही बांडगुळावाणी हृदयाशी घट्ट धरुनच का आहे?


एवढे पावले पुढे चालून आल्यानंतरही मागे जाते आहे.

भविष्याचे वेध न घेता भूतकाळीन क्षण का जगत आहे?


जीवनाच्या वाटा वेगळ्या झाल्या पण ध्येय समोर आहे.

असे नेहमी काहीतरी गमावल्याचा भास का होत आहे?


मन बावरे होऊन रोमरोमी माझ्याशीच का खेळते आहे?

प्रीत जोडली जिच्याशी ती का बरं अजुनी मुक्त आहे?


जत्रा भरली आणि सरलीही तरी तंबूच्या खुणा आहेतच.

तसे प्रेम जिव्हाळा आटूनही पाझर कसे बरं फुटते आहे? 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance