मधाळ हसणं
मधाळ हसणं
मधाळ हसणं पाहून मी, आजही तुझ्यात रमतो आहे
जुन्या आठवणीत आपुल्या, पुन्हा एकदा गढतो आहे
नटून सजून गजरा माळलेला, रूप तुझं स्मरतो आहे
सौंदर्य अतुल तुझे नेत्रपटलावर, आणून जगतो आहे
चाल तुझी मोहक अदांची, खजाना मज भावतो आहे
लुसलुशीत गुलाबी ओठांची, भाषा अजुनी बोलत आहे
तुझ्या सवे जगलेले क्षण, ऑक्सिजनप्रमाणे घेतो आहे
प्रत्येक क्षण जीवनाचा बघ, किती आनंदात जात आहे
प्रीत अनोखी नितळ निखळ, आजही मी जगतो आहे
घेऊन जरासा साद तुझा, आजही प्रेमात मी मग्न आहे
दिलासा नजरेचा सुखद, मजला आजही भासतो आहे
पण माझी तळमळ मनाची, तुला कधी कळणार आहे

