नको ते गुंतणे ......
नको ते गुंतणे ......


नको ते गुंतणे नयनांचे
नक्षत्रांच्या आभाळी
हरवून मनं जाते
विरहात अवकाळी...
अवकाळी येते किनार
हळवी ती भावनांना
कुठे असतो तो स्पर्श
गोठलेल्या जाणिवांना...
जाणिवांना उमजत नाही
उमाळे आसवांचे जेव्हा
कोसळतो नयनातुनी
उभा डोलाराही तेव्हा...
तेव्हा नसतो कोणी
आपला आपलेपणा देणारा
अन उगवत्या पहाटेची
देत नाही कोणी ग्वाही...
ग्वाही ती नात्याची
>कुणाला नाही देता येत
आज असेल भरलेली
ओंजळ प्रेमाची
उद्या रिक्त दोन्ही हात
हात देण्यास हातात
नसते कोणी जेंव्हा
भावबंध हे भावनांचे
जातात हवेत विरून तेंव्हा
तेंव्हा उमजते मनास
नाही नात्यानं मध्ये सूर
फक्त उरतो हुंदका आठवांचा
अन डोळ्यांत आसवांचा पूर
पूर जातो ओसरून
विस्कटून जातो गुंता
जपलेल्या नात्याचा
अन पुन्हा आभाळी
रमतो खिन्न सोहळा
तो भावनांचा ...