छेडून तार गेली,
छेडून तार गेली,
1 min
295
छेडून तार गेली,
तुझ्या आठवणीतली गाणी
मनांत रचून ठेवली होती,
शब्दांची नाजूक जुगलबंदी
स्वप्नांतले सूर हे सारे,
होते हृदयात साठवलेले
माळूनी काजव्यांना चांदरात्री,
अंगणी मैफिल सुरांची होती
दवबिंदूत पारीजक्त मोहरूनी,
आरास अंगणी सजली होती
अन तुझ्या आठवणीतली गाणी
छेडून तार गेली