ती कोण होती …
ती कोण होती …
1 min
164
पावसाच्या पहिल्या सरी सोबत
अलवार भिजणारी
वाहणाऱ्या बेभान वाऱ्याला
आपलंसं करत
अलवार पणे आपल्या बटांना सावणारी
ती कोण होती
कस्तुरीच्या मृगगधांने हर्षीत होणारी
निशिंगधांच्या फुला समवेत बहरणारी
अंबोली च्या फुला सारखी
अबोल असणारी
ती कोण होती
मिलनाची ओढ असलेल्या
सागराच्या अथांग प्रेमाकडे
धाव घेणाऱ्या अतुप्त नदी सारखी
पावसाच्या पहिल्या सरीत
माझ्यात एक रूप होणारी
ती माझी स्वप्नंसखी होती
स्वप्नंसखी होती ….
