संवेदना
संवेदना
हरवत चाली आहे संवेदना माणसातली
माणसानं मधल्या माणुसकीची
कोरडे पडले आहेत पाट भावनेचे
अन त्यातून वाहणारे विचार हि कोरडे
स्वार्था साठी आपल्या नेसले
अनेक मुखवटे त्याने
हसऱ्या चेहऱ्या मागे त्याच्या
विणले कूटनीती चे जाळे
नात्याचा ओलावा आता शब्दांपुरता राहिला
माणसां मधला माणूस फक्त कामापुरता राहिला
अबोल झाली नाती सारी
अबोल झाला झरा मायेचा
संवेदना हरवलेल्या या जगात
हरवला संवेदनशील माणसाचा
हसरा चेहरा

