ओलीचिंब प्रिती...
ओलीचिंब प्रिती...
ढगाआड असे रवी
सांज पावसाळी होती
हरी साठी राधिकेची
व्याकुळली प्राणज्योती
सखी बावरून जाई
थेंब टपोरे झोंबती
जणू अक्षरे प्रेमाची
पाणी होऊन वाहती
पाऊलात दोघांच्याही
पुष्प नुपूरे सजती
पर्णवृष्टी सोबतीला
प्रेमी न्हाऊन निघती
वाऱ्यासवे गंधाळली
राधे मोहनाची प्रिती
होता मिलन जीवांचे
मोहरत असे क्षिती

