STORYMIRROR

Anu Dessai

Fantasy Others

3  

Anu Dessai

Fantasy Others

न्हाऊ घालते..!!

न्हाऊ घालते..!!

1 min
257

दिसभर बाळ तान्हे

माती वाळूत खेळते

अंगणात खेळताना

चिखलात ते माखते


बरसता मेघसरी

जसे कमळ फुलते

वाऱ्यासवे झोक्यावर

अलगदची झुलते


जीव थकला इवला

मागे पाऊल वळते

पदराआड मायेच्या

बाळ खट्याळ लपते


सांज काजळी होताना

मांडीवर झोपवते

ऊबदार पाणियाने

माऊली न्हाऊ घालते


Rate this content
Log in

Similar marathi poem from Fantasy