तिची सावली..!
तिची सावली..!
बालपणी पैंजण ती
पायी तिच्या गं वाजली
लेक तिची इवलीशी
मातृमुखी गं शोभली
ओलांडून उंबरठा
तारूण्यात बहरली
आई डोळ्यात साठवे
तिची यौवन सावली
छबी गर्भार पणात
बाई लेकीची खुलली
माय जीवापाड जपे
तिच्या उदरी लपली
ओझरत गेलं वय
जागा लेकीने घेतली
लेक सामोरी दिसता
नवी माय गवसली
