कुस उजवली..!!
कुस उजवली..!!
1 min
299
होती पौर्णिमेची रात्र
कूस तिची उजवली
जलधारा मेघियांच्या
वसुंधरा सुखावली
नभी चमकती तारे
भुमी सारी उजळली
येता ढगांचा आडोसा
चंद्रिकाही झाकोळली
येता भरती सागरा
लाट तटी स्थिरावली
छातीतूनी उसळता
पान्हा माय शहारली
भुक भागता पोटाची
लेक कुशीत निजली
स्वप्न सुखाची बघत
हलके ती विसावली
