डोहाळ जेवण..!
डोहाळ जेवण..!
तिचं डोहाळ जेवण
गौरीवाणी ती सजली
वाडी लेवून फुलांची
झुल्यावरती बसली
कधी इवला अंकुर
देई आतून चाहूली
ओटी भरेल आता नि
बाई होईल माऊली
लेक होऊ दे मागते
असे तिचीच सावली
नऊ मास प्रतिक्षेचे
आई नवसा पावली
