STORYMIRROR

Abasaheb Mhaske

Fantasy Tragedy

3  

Abasaheb Mhaske

Fantasy Tragedy

तू नभांगणीची

तू नभांगणीची

1 min
27.9K


तू नभांगणीची चटक चांदणी, मी वणव्याची ठिणगी ग  

तू स्वप्ननगरातील नंदनवन, मी आश्वासनाचं माहेरघर 

तू पुढच्या तारखेचा चेक प्रिये, मी कर्जखात्याचे अकाउंट प्रिये 

तू हवीहवीशी मंद झुळूक, मी घोंगावणार वादळ ग

तू सुगीची भल्लरी प्रिये, मी अंकुरणार धान ग 

तू सुकर जगण्याची आस प्रिये, खंबीर मनाचा ध्यास ग 

कृषी संस्कृतीची पाईक तू, सर्वानी गृहीत धरलेलं गिऱ्हाईक मी 

तू सावरणारी हाक प्रिये, मी या जगाचा पोशिंदा ग 

तू चिवचिवणारी चिमणी ग, मी नाहक बदनाम काक प्रिये 

तू गोड गळ्याची रुदाली, मी नको असलेला सहप्रवासी 

तू संधिसाधु  खुर्ची ग, मी दुःख शिवणारा केवळ दर्जी 

तू समूहगान, कुस्तीचा आखाडा ग, मी समृद्ध जगण्याची अडगळ प्रिये

तू सुखी जीवनाचं केवळ भास, मी अनिवार जगण्याची आस प्रिये 

तू शहरी जीवनाची आस प्रिये, मी द-या - खोऱ्यातील ढाण्या वाघ 

तू काळजीवाहू सरकार प्रिये, मी हताश जनतेचा हुंकार ग 

तू अनिवार्य तिसरे महायुद्ध प्रिये, निराश, हतप्रभ राष्ट्रसंघ प्रिये


Rate this content
Log in

Similar marathi poem from Fantasy