स्मृतित साठवावं या क्षणांना..
स्मृतित साठवावं या क्षणांना..
शब्द तसे आहेत मर्मीळ
वेळ तसा आहे दुर्मिळ
मोजक्या शब्दात जोडावं दोन मनांना
स्मृतित साठवाव या क्षणांना..
हृदयास माझ्या कायम तुझे स्मरण
तुझस्मरण करीतच यावे मज मरण
तुझसाठीच गाव, गात राहाव या स्वरांना
स्मृतित साठवाव या क्षणांना..
सादगित तुझ्या हे क्षण स्तब्ध
तुझसाठी आज अपुरे आहेत शब्द
बस बघाव आणि बघतच राहाव तुझ्या डोळ्यांना
स्मृतित साठवाव या क्षणांना..
विसरेल उद्या वाटत असेल तुझ्या मनाला
एकच मागन माझ या देवाला
असच..असच..थांबव
या हृदयात पेरलेल्या क्षणांना..
