प्रियराधन
प्रियराधन
विखुरलेल्या शब्दांना कवितेत जोड़त होतो..
प्रेमाच रोप लावून कळी फुलन्याची वाट पाहत होतो
चंद्रात तुझी प्रतिमा बनवत होतो..
वाऱ्याच्या झूळकेत तुझ अस्तित्व स्पर्शत होतो
समुद्रकिनार च्या रेतीत एकटाच चालत होतो..
येणाऱ्या लाटांमधे तुझा स्पर्श जाणवत होतो
निळाशार आभाळाला उगाच खुनवत होतो..
ढगाशी ढग जोडून तुझच चित्र रंगवत होतो
तुझ्या नसण्याचा विचार करू शकत नव्हतो..
आयुष्याच्या हार प्रेमाच्या फुलांनी गुंफत होतो..

