रंगी रंगला श्रीरंग
रंगी रंगला श्रीरंग
1 min
236
रंगी रंगला श्रीरंग
भाव उधळे कीमती
सखी जीवाला भावली
मनी गुलाल आनंदी ।।१।।
चाले मोहुनी प्रेमाची
अदा देवाण घेवाण
नाच नाचली बेभान
अंग रंगात न्हाहूनि ।।२।।
जिणं रसाळ भरती
फुलं सुंगंधा सारखं
गीत गाऊन सुरात
दीन सुहान करती ।।३।।
संगे सोबती सख्यानी
फेर धरली मस्तानी
सण होळीचा सुरेख
बन बन्जाव धुंदाळ ।।४।।
प्रेम सावली दंगात
जग भुलला यवनी
नाद नांदूंनी एकत्रि
दूर झालिया मलाळ ।।५।।
----------------------------------------