प्रीतरंग
प्रीतरंग
नंदगावचा कान्हा
बरसानाची राधा
गोपिकांची ही पहा
प्रीतरंगाची अदा..।
कृष्ण अन् राधेचा
खेळ असा रंगला
प्रणयाच्या उत्सवात
नृत्य करीत दंगला..।
मदनाची पिचकारी
हळूवार मारतो
प्रियतमेस अडवून
वाट कशी रोखतो..।
प्रेम अन् भक्तीचे
अनोखे हे रूप
रंगात चिंब न्हाऊन
मानते राधा सुख..।

