सखी तुझ्या स्मृतींनी.....
सखी तुझ्या स्मृतींनी.....
1 min
229
सखी तुझ्या स्मृतींनी हरवूनी सखा गेला,
व्याकूळ झाले शब्द, वारा हि हळवा झाला !!!
ओठांत विरली गीते, घायाळ कविताही जाहल्या..
मनांतील या विराणीचा स्वर वाऱ्यावरती मुजोर झाला !!!
नादात तुझ्या स्मृतीच्या चालती दौतीच्या लेखण्या,
निळ्या आकाशात ही तुझ्या स्मृती गंधाच्या उधळल्या केशरी छटा!!!
पक्षी ही किलबिल करती, वाटेवरती शीळ वाजवीत जाती,
एकाकी सखाच्या कानी स्वर सखी चा कुजबुजला!!!
जरी उमतो कानी नाद, नाहीच सखी तेथे,
पारीजक्त बहरुनी अंगणी सखा असे एकाकी सखीविन उसासलेला!!!
