पाऊस...
पाऊस...


तो अवेळीच आला होता
नेहमीसारखा
त्याला गरज होती म्हणून
तोही भिजला होता
त्याच्या आसवांत
तिलाही गरज होती म्हणून
ती ही भिजली होती
त्याच्या शब्दांच्या मैफलीत
त्याचं असं अवेळी येणं
सुखावून गेलं होतं
त्या दोघांनाही
तो पाऊस होता
जो अवेळी आलेला
त्या दोघांना एकत्र
आणण्याचा तो बहाणा
तिच्या आठवणीत त्याने
आणि त्याच्या शब्दांत तिने
एकत्र भिजण्याचा बहाणा
वाटते भीती आता
शब्द चुकतील…
अन येईल पुन्हा
दुरावा…
तरी वाटतं या मनाला
सर्व काही माहीत होते
आणि ते
तुलाही जाणवलं होतं का
तुझ्याशी मैत्री करायचे
किती बहाणे शोधले
मात्र तो आला अवेळी
अन्
पुन्हा मनाला नवे
प्रेमाचे धुमारे फुटले
प्रेमाचे धुमारे फुटले…