STORYMIRROR

jaya munde

Romance

3  

jaya munde

Romance

जीवन एक संघर्ष

जीवन एक संघर्ष

1 min
159

मनात माझ्या दाखल होऊनी

सहज गेला निघूनी,

किती साहू विरह प्रिया रात्र ही झाली वैरिणी.....!!धृ!!


 तुझ्या सहवासी किती मी रमले

 स्पर्शाने असे मज बेधुंद केले.

 वेडीपिशी होई त्या धुंदीची चाहूल लागूनी,

*किती साहू विरह प्रिया रात्र ही झाली वैरिणी*...!!१!!


 दूर जरी तू मजजवळी भासतोस,

 स्वप्नात येऊनी हळूवार हासतोस.

क्षणक्षण सौख्य मानिते तुझ्या स्वप्नी रमूनी,

*किती साहू विरह प्रिया रात्र ही झाली वैरिणी*..!!२!!


 सोसवेना विरह हा जीवघेणा

 सत्वरी येऊनी मज जवळी घे ना.

आनंद नांदू दे तुझ्या सहवासाचा या जीवनी,

*किती साहू विरह प्रिया रात्र ही झाली वैरिणी*...!!३!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance