माझे आतुरले मन
माझे आतुरले मन
सख्या! तुझ्या प्रेमासाठी
माझे आतुरले मन
सदोदीत मला येते
येथे तुझी आठवण..!
तुझे प्रेम मन माझे
सदा तुला शोधत असे
कासाविस मनी माझ्या
तुझे रूप मला दिसे..!
तुझ्यामुळे होवो सख्या
माझे आनंदी जीवन
सुख मिळो मला सदा
हरखून तन-मन..!
सख्या तुझ्याविना मला
नाही कोणाचा आधार
माझ्यासवे प्रेमासाठी
घेशिल का? पुढाकार..!
सख्या! तुझ्या प्रेमामध्ये
राहते अशी बेभान
क्षणोक्षणी गुंतलेल्या
तुझ्या आठवणी छान..!

