परत त्या वाटेला
परत त्या वाटेला
_________________________
परत त्या वाटेला
नजर लागली ग
येतील का दिवस
मज प्रेम गोडीला
झालीस लांब गुमान
चालता सुटला ग तोल
येती सय तुझी सदा
ये ना घे समजून मला
बोललो रागानं तुले
चुकीचं होतं माझं
गेलीस रुसून रागानं
सोडून गेलीस मले
परत त्या वाटेला
ये ना पुन्हा संगतीला
गाऊ आनंदाने गाणे
भरू ममतेचा जीवघडा
जगू फुलासारखं घडीला
बिखरू प्रेम सुंगंध
आहे जीणं क्षणभंगूर
करू सार्थक या जगण्याला
_________________________

