हृदयी वसंत फुलतांना
हृदयी वसंत फुलतांना
हृदयी वसंत फुलतांना
मनास उभारी यावी
सुरात सूर लावतांना
प्रेमाची गाणी गावी
हृदयी वसंत फुलतांना
श्रावणाची सर यावी
झोक्यावर मन झुलतांना
बेभान होऊन जावी
हृदयी वसंत फुलतांना
मनाला का छळावे
सख्या माझ्या मनीचे
तुला न सांगता करावे
हृदयी वसंत फुलतांना
बेधुंद होऊन जगावे
स्वप्न आपल्या घराचे
दोघांनी मिळून बघावे
हृदयी वसंत फुलतांना
नजरेत तुझ्या दिसावे
आनंदाचे भरून डोळे
ओठावर हसू असावे
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

