असे ओघळावे अश्रु
असे ओघळावे अश्रु
कशी ती सावली, जातेस सोडूनी
वसे माझ्याच संगी, तीच हासूनी
जरी येऊन जाते, स्तब्ध खामोशी
तिची नाहीच धास्ती, सांग ठासूनी
पिसारा तू मनी, गेलीस पाहूनी
सखीची तार छेडे, संग राहूनी
असे काही कधी, होणार का राधे
मला तू आठवेना, दूर जावूनी
तुझे आसूच आहे, आसवे माझे
अश्रूंनी ओघळावे, आसवातूनी

