STORYMIRROR

Shrikant Dixit

Romance

3  

Shrikant Dixit

Romance

रंगात रंगले मी..

रंगात रंगले मी..

1 min
381

🌈💕🌈💕🌈💕🌈💕🌈💕

अंतरंगी उठता तरंग

तुझ्या प्रीतीच्या रंगात रंगले

क्षणात दंग शिरशिरी अंगी

धुंद होऊनिया मीच हरले..💦


सोहळे सुखाचे संग मांडले

सप्तरंगी उधळण करूनी 

दरवळे रंग केशरी मधूर

तुच माझा गेलास होऊन💢


निलवर्णी माधव वाजवी पावा

शुभ्र मोत्यांची भरली ओंजळ 

बावरी मी राधा रक्तीमा गाली

पवित्र नाते किती सोज्वळ🍃


महक सुगंधी अवचित आला

रंगूनिया गेले रंगात सजना

देहभान गेले विसरूनिया

मूक स्पर्श अबोल भावना 🍂

🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance