STORYMIRROR

Shrikant Dixit

Inspirational

3  

Shrikant Dixit

Inspirational

शिवशाहीचा शिवसूर्य तळपती

शिवशाहीचा शिवसूर्य तळपती

1 min
173

जय भवानी जय जगदंबे । नमन तुज अंबे । करूनी आरंभे। डफावरी मारूनी थाप । देऊ तणतुण्या ताण । ऐका शिवबाचे गुणगान... जी जी जी ॥१॥


शिवशाहीचा शिवसूर्य तळपती। तया पाहूनी शत्रू थरथरती।

शौर्याची ही अखंड ज्योती । मरहट्ट्यांचा श्वास शोभती ।

त्रिभुवनी शिवबाची किर्ती... जी जी जी ॥२॥


घडविला शिवबानी इतिहास । लाभला जिजाऊचा सहवास ।

स्वराज्याचा घेतला ध्यास । घेऊनी मावळ्यांना सोबतीस ।

अवघ्या प्रजेने टाकला विश्वास... जी जी जी ॥३॥


जिंकुनी एक एक गड । दिले उत्तर शत्रुस साडेतोड । 

जरी मोगलांनी केली मोडतोड । शिवबांच्या नेतृत्वाची जोड ।

राजधानी केली रायगड... जी जी जी ॥४॥


गड आला पण सिंह गेला । एक एक मावळा लढला ।

वध अफजल खानचा घडविला । मोगलांना मावळा नडला ।

स्वराज्याचा अभेद्य गड राखला... जी जी जी ॥५॥


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational