STORYMIRROR

Shrikant Dixit

Romance

3  

Shrikant Dixit

Romance

तुझं अस्तित्व

तुझं अस्तित्व

1 min
376

तुझं अस्तित्व माझ्यासाठी

तु नसतानाही सोबत असतं

आठवणींचा कैफ तुझ्या

सदैव माझा आधार बनतं


जाण्याने वेदनेची रेषा

सोबत माझ्या सोडून गेलीस

अखेरचा हा श्वास सोडून

याच मांडीवर विसावलीस


तुझा भास सोबतीला माझ्या

दिवस रात्र असतो भवती

एकलेपणाची झालर मला

कधीच न जाणवती


संग माझा छंद माझा

वेडावतो अजूनी तुजला

सांग सखये येशील परतुनी 

कधी भेटण्यास मजला?


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance