आला वसंत ऋतू हा..
आला वसंत ऋतू हा..
मोहरल्या अंब्याखाली
तू मजसी भेटावे
फुलता वसंताला
दोघांनीही पहावे....१
सृष्टीच्या या बदलाने
अंग अंग शहारावे
प्रीतीच्या गुलकंदाला
अजुनी गोड करावे....२
दवबिंदूची शाल आता
घडी घालूनी ठेवावी
पर्णफुटीचे जल्लोषात
स्वागत ते करावे....३
तप्त रविकिरणांने
होरपळून ते जावे
मनातील वसंत मात्र
फुलवित रहावे....४
हिरव्या निसर्गा संगतीने
रंध्रारंध्रात श्वास भरावा
सोहळा वसंत पंचमीचा
सप्तरंगी साजरा करावा....५

