तुंबडी गीत
तुंबडी गीत
लख्खलख्ख लख्खलख्ख, तुंबडी का गाना
तुंबडीवाला आला त्याची, तुंबडी भरून देना ॥धृ॥
भाव भक्तीने मी एक गीत गातो
भक्ती भावात लीन होऊन जातो
देव पाठीशी कसा उभा रहातो
दूरूनच आपल्याला न्याहाळतो
माझ्या समवेत अशी भक्ती तुम्ही पण करना
तुंबडीवाला आला त्याची, तुंबडी भरून देना ॥१॥
आपलेच ओठ आपलेच दात
मिळणार यश जिथे घालू हात
नव्या युगाची तुम्ही नवीन आशा
चमकून दाखवा हो दाही दिशा
होण्यास विजेते तुम्ही प्रयत्न करून पहा ना
तुंबडीवाला आला त्याची, तुंबडी भरून देना ॥२॥
व्यसनाची तुम्ही नका धरू कास
वाईट असा हा जीवनाचा फास
धरूनी सुसंत सफल जीवन
धन्य होऊन आम्ही होऊ पावन
सदाचार विवेक वाणी सदा होठों पे हो लाना
तुंबडीवाला आला त्याची, तुंबडी भरून देना ॥२॥
