सूर वेणूचे
सूर वेणूचे
🌴💫🌸🎋🦚💞🌿🌹🌺🦋
हरी माळतो गजरा
बघ राधेच्या कुंतला💞
पहा हा सावळ्याचा
कसा रे जीव गुंतला💫
माथ्यावरी मोरपीस
शोभतसे भरजरी
राधा नटून थटून
ल्याली वस्त्र भरतारी🌈
झाले तल्लीन दोघेही
सूर वेणूचे ऐकून🌿
दर्पणात न पाहता
सजवले या राधेला💞
यमुनेच्या तटावरी
कदंबाच्या वृक्षाखाली🌴
मग्न होता हा मुरारी
सख्या प्रित बहरली☘️
धुंद ही पुष्पवाटिका
मोगर्याच्या सुगंधाने🌸
शृंगारली राधा राणी
प्रफुल्लित आनंदाने🌹
💕🌿🌸🌴💞☘️🌹🌈🎋🌺