कधी तू..
कधी तू..
मस्त मजेत जीवन जगावे
कधी तू.. हसावे कधी रूसावे
मी मात्र तुजकडे पहात बसावे
तुझ्या नजरेत हरवून जावे💞
हृदयी साठवूनी ठेवावी माझ्या
गुंतलेल्या हृदयाची आठवण
पेरलेला श्वास आहेस तू माझा
आहेस माझ्या स्पंदनाचे कोंदण💕
तुझीच असावी मी व्यस्तता
उधळूनी रंग तुजसवे प्रितीचा
पहाटेला सखे तुला पांघरावे
धुंद प्रितगीत तू गुणगुणावे 🎼
तुझ्या रेशमी कुंतल्यात सखे
हळूवार मी हात फिरवावा
अधर माझे सखये तुझ्या
ओष्ठपाकळ्यांना बिलगावा💋
💕☘️💕☘️💕☘️💕

