फुंकर
फुंकर
1 min
276
ओल्या जखमेवर एक फुंकर
सुखद गारवा देऊन जाते..
पण तीच फुंकर विस्तवावर मारली तर??
निखारा फुलून येतो...
अगदी धगधगतो निखारा
मनातील वेदनाही अशाच असतात
अगदी जीवाची काहिली होते
मन तळमळत रहाते...
ऐन उन्हाळ्यातही तळपणारा सुर्य
अंगाची लाही लाही करतो..
हवेची झुळूक सुखावून जाते..
कधी मनाविरूद्ध तर कधी मनासारखे जगता येते..
मग घालायची समजूतीची एक अलवार फुंकर..
आठवते का ती मायेची फुंकर?
चालता चालता लागलेली ठेच
फुटलेले गुडगे..
मग "पैसे पडले बघ..म्हणत
अलगद कवेत घेत..
मायेचा ओलावा असणारी फुंकर..
अशीही..
