सप्तरंग...
सप्तरंग...
व्हावे हे जीवन आपले दंग
उधळू या आनंदाचे हे सप्तरंग
सण हा होळीचा प्रेमाच्या रंगात न्हावू
आनंदाचा समतेचा हा प्रेमाचा रंग लावू
जीवनाच्या वाटेवर आनंदाने नाचू
आनंदाच्या या होळीच्या क्षणाला जपू
सप्तरंगात रंगून या होळीचा आनंद घेऊ
रंग हा प्रेमाचा होळीचा आनंदाने लावू
रंग हा प्रेमाचा आनंदाचा स्नेहाचा
दिवस हा आनंदाचा क्षण हा सुखाचा
रंग हे होळीचे एकमेकांच्या रंगात रंगतात
रंग हा प्रेमाचा होळीचे महत्व सांगतात

