STORYMIRROR

Amol Sone

Romance

3  

Amol Sone

Romance

अबोल शब्द

अबोल शब्द

1 min
313

भावना अनेक असतात नेहमी शांत या मनात

व्यक्त होतांना अबोल होतात त्या काही क्षणात

अबोल शब्द मनातले ओठांवर कधी येत नाही

वेड्या मनाचे या कधी मनालाचं कळत नाही


बोलाताना शब्द कधी ओठांतून परत येतात

मन वेडे भटकते तेव्हा शब्द हे अबोल होतात

गालावर हसू दाखवून शब्द हे अबोल होतात

अबोल शब्त मनातले डोळे दाखवून देतात


मनातले मनाला कळत नाही शब्द अबोल होते

व्यक्त होताना मनातले मन हे वेडे भरून येते

सांगायचे असते पण शब्द हे वेडे अबोल होते

बोलताना मनातले शब्द ओठांवरून परत जाते


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance