हरवलेलं बालपण..
हरवलेलं बालपण..
1 min
262
निरागस दिसणे ते आठवते हरवलेलं बालपण
खट्याळपण बालपणीचं असलेलं निरागस मन
गेले ते सरून बालपण हरवले ते निरागस मन
शोधून ही सापडेना हरवलेले बालपणीचे क्षण
आठवणीच्या झुल्यात झोका घेत होते हे मन
बालपणीच्या सुंदर दिवसाची झाली आठवण
बालपणीचे ते सर्व सुंदर खेळ होते हे निराळे
झाली बालपणीची आठवण भरून येते डोळे
रानात फिरणे भटकणे सुंदर होती ती माळराणे
बालपणी मन मोकळे खेळणे होते ते मुक्तपणे
बागेत फिरणारी फुलपाखरे जणू कुठे हरवले
बालपणीच्या आठवणीत होते मन वेडे हे गुंतले
