कॉलेज कट्टा
कॉलेज कट्टा
1 min
191
मित्रांच्या मनातली लपलेली बात होती
मित्रांच्या जोक्सची झालेली बरसात होती
मैत्रीत कधी वेगवेगळ्या नावाने चिडवायचं
मैत्रीत मित्रांना कधी हसवायचं रडवायचं
मित्रांनी घडवलेला आमचा मैत्रीचा होता कट्टा
कधी मैत्रीत होऊन गेलेली मैत्रीचा होती थट्टा
कॉलेजच्या गर्दीमधली ती एक आठवण होती
मित्रांच्या मैत्रीची प्रेमाची ती साठवण होती
अभ्यास करून तेव्हा खूप स्वप्न पाहिली होती
आठवते खूप हसलो खेळलो मजा केली होती
पुन्हा त्या कॉलेजच्या दुनियेत परत जावे वाटते
गेलेले गोड क्षण पुन्हा पुन्हा आज जगावे वाटते
