अल्लडपणा
अल्लडपणा
1 min
281
निरागस ती सवय मनाला बेधुंद करणारी
सुंदर आठवण ती गालावर हसू येणारी
बेधुंद वाऱ्याचा अल्लडपणा हा खुणावतो
आठवणीच्या पावसात मनाला भिजवतो
रम्य आठवणी ते सुंदर दिवस बालपणीचे
अल्लडपणा तो क्षण ते निरागस मनाचे
जगून घेऊ हे क्षण सुंदर या अल्लडपणाने
भिजूया पावसात या पुन्हा बेधुंद मनाने
अनुभवायचा तो अल्लडपणा कोवळ्या वयाचा
पुन्हा अनुभवायचा गेलेला क्षण तो बालपणीचा
क्षण तो अल्लडपणाचा पावसात भिजण्याचा
कधी रानात फुलपाखरू होऊन फिरण्याचा
