माझी नीलपरी
माझी नीलपरी
निसर्गाच्या सन्निध्यात
बावरणारी माझी नीलपरी
पाहता कां बरे मी लाजतो?
तिच्या अदा पाहुनी मी लाजतो
छान दिसते प्रिया नील अंबरी......१
काळे कुरळे केस मानेवर
पदर निळा फडफडे वाऱ्यावर
किती छान दिसते सौदर्य कामिनी?
भान माझे हरपते तीज पाहुनी
गर्व आहे मला माझ्या प्रियेवर....२
सुंदर प्रसन्न वातावरण सृष्टीचे
हिरवे हिरवे सभोवताली रान
नभातून अवतरली कां निल यामिनी?
तिज पाहुनी हर्ष मनी उमलतो
नाही राहते मग माझे मला भान.....३
वाटे स्वप्नातली माझी निलपरी
भूवरी अवतरली माझ्यासाठी
काय हर्ष वर्णू मम मनाचा?
वेडा झालो मी तिच्या सौंदर्यावर
बोलू तिला कसे मज कळेना
वेडा झालो मी तिच्या अदांवर....४

