रणचंडी भवानी महिषासुरमर्दिनी
रणचंडी भवानी महिषासुरमर्दिनी


रणचंडी भवानी महिषासुर मर्दीनी
नवदुर्गा तु आदिशक्ती तुच खरी रणचंडी |
शितला कधी तर कधी गळ्यांत नरमुंडी | |१| |
कधी होऊनी जगन्माता घेशी आम्हा उरी |
विघ्ने येता लिलया तू आम्हांसी पार करी | |२| |
ठेव सदा अशीच माते कृपा आमच्या वरी |
शांती सुख समृद्घी नांदो सर्वांच्याच घरी | |३| |
आज पातला शत्रु येऊन ठेपलाय देशदारी |
होऊनी तव हिंदमाता धूळ त्या शत्रुशी चारी | |४| |
भवानी तलवार देइ आज अमुच्या करी |
नेत्रातूंनी अंगार फेक त्या दुष्ट यवनां वरी | |५ | |
करी मर्दन त्या नामर्दांचे असती बलात्कारी |
स्री निष्पाप बालिकांस पिडती जे अत्याचारी | |६| |
दे शक्ती त्या सबलांना ठरो कधी न अबला |
छाटूनी गे हात तयांचे डोक्याचा करु तबला | |७| |
शुंभ निशुंभा परी राक्षस जणूआज मातले |
स्री बालिकांच्या रक्ताने हात ज्यांचे माखले | |८| |
रक्तपिपासु श्वापदांनाही ज्यांनी मागे टाकले |
माता पित्यांचे ही लज्जेने शीर खाली वाकले | |९ | |
महिषासुर मर्दीनी होऊनी घेशी अवतार खरा |
पिडीतांच्या अन्याया विरुद्घ फोड वाचा जरा | |१०| |
नवरात्रींच्या सर्वच रात्री रंगवू गरबा जागरण |
दे स्वातंत्र्य सम्मान अन्यथा करू उपोषण आमरण | |११| |
आज समाजात दिवसेंदिवस वाढतच जाणारा स्त्रीयांवर होणारा अत्याचार,अन्याय व देशास परकीय आक्रमणापासून वाचविण्यासाठी स्री शक्तीने नवदुर्गेला केलेले आव्हान वा तिची आर्जव होय. ह्या दुनियेतील सर्व मंगल,चैतन्यरूपी दैवी शक्तीचा तिला आधार हवा आहे.नवरात्रीला ती या नवदुर्गेचा जागर गोंधळ घालू पहातेय!