कोरोना जाईना.........
कोरोना जाईना.........


काही केल्या कोरोना जाईना,
आम्हाला शाळेत जाता येईल असे दिसेना.
कोरोनाचा कहर आहे जिकडे तिकडे,
तरी लोकं आपल्या घरात बसलेले दिसेना.
व्हेंटिलेटर,ऑक्सिजनचा आहे तुटवडा,
तरी लोकं सोशल डिस्टन्सिंग पाळतांना दिसेना.
कोरोना अलर्ट विषयी सोशल मीडियावर तज्ञ सारे,
ते मात्र स्वतः आत्मसात करतांना दिसेना.
उगाचच फिरण्याच्या हट्टापायी,
घरातील आपल्या कुटूंबाची काळजी घेतांना दिसेना.
हॉस्पिटलमध्ये बेड व स्मशानात जागा नसतांना,
तरी आपली लोकं मास्क वापरतांना दिसेना.
उजाड झाले संसार अनेक,
तरी कोणीही कोरोनाला गांभीर्याने घेतांना दिसेना.
काही केल्या कोरोना जाईना,
आम्हाला शाळेत जाता येईल असे दिसेना.