STORYMIRROR

Pakija Attar

Tragedy

4  

Pakija Attar

Tragedy

आकाश फाटले

आकाश फाटले

1 min
316

रात्र दिन वर टाईम करूनी थकत नाही बाबा

अपुला लाल सुखी राहो ध्यास करती बाबा


पोटाला चिमटा देऊन पै पै  केला जमा

जन्मानंतर अलंकार घालुनी कुरवाळले तुला


कटी खांद्यावर घेऊनी म्हणती जग पहा जरा 

तूच उद्याचा धनी माझ्या संपत्तीचा राजा


पडलास आजारी न पाय थबकले जरा

तनमनधन अर्पण करूनी केले तुला उभा


शिक्षण देऊनी ठेविले उच्चस्थानी तुला

गाडी बंगला धावुनी आले तुझ्या स्वागताला


पण विसरलास एका क्षणात लाडका बाबा

ठेवायलाा नाही तुझ्याकडे थोडीही जागा


हात हातात घेऊन ये चालायला शिकवले जगा

त्याच हातांनी बाबांना वृद्धाश्रमात दिली सजा

 

आकाश फाटले ठिगळं लावतील कुठे बाबा

तुझ्या आठवणीत सुख मानतील का बाबा


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy