बंद
बंद
समंद बंद हाय पोट बंद नाय
उमगतं मज पण करणार काय
घरात पोरगं रडतय खायला नाय
कवाधरनं सांगतया बंधन सर्व हाय
चायनातुन आलया म्हणं हा करोना
घरातच कोंडलेया सर्व मानवांना
पोटाची आग गप्प बसूू देईना
रडरडून डोळे लेकराचे सुजले ना
देवासारखा माणूस घरी येईल ना
लेकराला पोटभर खायला देईल ना.. !