निळे मेघ
निळे मेघ
चिमणीच्या धुराने आकाशभर वेढले
वाहनांच्या धुराने तसूभर ना सोडले
नभातल्या निळया मेघांनी अमृत बरसावले
येताना अमृतात प्रदूषण मिसळले
अमृत पिण्या मृग वनात नाचले
दूषित अमृताने मृग जीवाला मुकले
हिरवेगार तृण भरभर वाढले
दूषित तरुणांनी सर्वांना हेरले
पशुपक्षी मानव कुणी ना सुटले
प्रेम प्राणी निसर्गाचे नाते कोणी तोडले
देणे दिले निसर्गानेे घेणे चुकले
पर्यावरण टिकविण्या मानवाने माथे टेकले