मेघ दाटले
मेघ दाटले
1 min
330
मेघ दाटले बरसला पाऊस
तीन थेंबांनी धरली वेगळी वाट
एक पडला शेतात जाऊन
बळीराजाला मदत मी करेन
समाजाच्या उपयोगी मी पडेन
मातीशी मी एकरूप होईन
मेघ दाटले बरसला पाऊस//
दुजा पडला झाडाच्या पानावर
हिरव्यागार पानावर हिऱ्यावाणी चमकेन
दवबिंदू बनवून भुरळ पाडीन
घरंगळून लगेच मातीत मिसळेन
मेघ दाटले बरसला पाऊस//
तिजा पडला समुद्राच्या लाटांवर
पांढराशुभ्र शिंपल्यात मी जाऊन पडेन
अनमोल मोत्याचे मानाचे स्थान
मेघ दाटला बरसला पाऊस//
तुम्ही तुमच्या जीवनाचे शिल्पकार
परोपकारी थोडीशी चमक हिरा अनमोल
सांगा पाहू तुमचा काय विचार
मेघ दाटला बरसला पाऊस//