पराधीन
पराधीन
सगळं कसं आनंदात सुखात वावरत होते मी
करोना विषाणू प्रवेश केला परका झालो मी
तापखोकला आला सोबत सगळेच उडाले
शिवाशिव झाल्यासारखे सगळेच दूर पळाले
फोन फिरवला आली रुग्णवाहिका करत घुईन
खिडकीत उभे राहून डोळे पहाती विस्फारून
कपडे औषध पिशवीत भरून दिधले फेकून
रुग्णवाहिका पर्यंत न कोणी आले निघे वाकून
रोज पिंगा गोष्टी ऐकण्या आजीच्या पाठी
खिडकीत उभी बाय करीत माझी लाडली
उमजले मला जगी कोण आहे आजचा
पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा