वर्षाराणी
वर्षाराणी
1 min
305
मुंबापुरीस घालण्या न्हाऊ केला विचार
मेघकन्यांना दिला आदेश तात्काळ
धरणीस भेटण्या मेघ कन्या घेइ धाव
नखशिकांत ओलेचिंब होई मानव
रेल्वे पकडण्या एकच उडे धांदल
अटहासाने म्हणे रेल्वे मी थांबणार
मानवास ने आण करते रोज
मला कंटाळा आलाय पुरता आज
मानव धावे थांबविण्या बस
बसला थांबण्यास मिळेेना उसंत
मानव धावे करण्या फोन
तिथेे लागलीया मोठी रीघ
झालाय घोटाळा एकच क्षनभर
जणू सोडले मुंग्यांनी वारूळ
प्रत्येकाला घरी जाण्याची ओढ
. म्हणून होई जिवाची घालमेल
किती प्यारा मानवा तुझं जीवन
एका क्षणात वर्षा राणीने केलाय हाय
