STORYMIRROR

Sakharam Aachrekar

Tragedy Others

4  

Sakharam Aachrekar

Tragedy Others

रंग उसणे नभाचे

रंग उसणे नभाचे

1 min
369

आज अचानक कसे हरवले, क्षितिजावरले तारे

आयुष्य माझे तुला गवसले, विरहात तुझ्या सारे

स्वप्नांत मजला उगाच छळती, भास कालचे सुखाचे

मी काव्यात उधळीत आहे रंग उसणे नभाचे


आता वाटते तपे उलटली तरीही रात्र सरेना

उरात सलते दुःख पण तुज आस माझी कळेना

किती बरसले देहावर या श्रावण आसवांचे 

मी काव्यात उधळीत आहे रंग उसणे नभाचे


रोज फुलतो मध्यरात्रीला, पारिजात तुझ्या बनीचा

तरी ना कळे तुलाच कधीही, सुगंध माझ्या मनीचा

असे विरले तुझ्यासवे गंध माझ्या जीवाचे 

मी काव्यात उधळीत आहे रंग उसणे नभाचे 


असे भासते सूर्यास्तासह, मावळेल का प्रीती 

माहीत नाही बहार येऊन अवकाश झाला किती 

तरी अजून ना दाटून येती घन आनंदाचे 

मी काव्यात उधळीत आहे रंग उसणे नभाचे                  


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy